Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:44:12 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | 60 हजार कोटीचा घफला युतीचाच - मुख्यमंत्री
60 हजार कोटीचा घफला युतीचाच - मुख्यमंत्री
Mumbai(28-July-2010)
Tags : National,Maharashtra
 

मुंबई, दि. 27 (प्रतिनिधी) - शिवसेना-भाजप युती सरकारच्या कारकीर्दीत मुंबईतील जमीन व्यवहारात 60 हजार कोटी रूपयांचे गौडबंगाल झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केला. युती सरकारच्या काळात आकृती आणि रूचिप्रिया डेव्हलपर्स यांच्या मंजूर झालेल्या प्रकल्पांची तसेच त्यांना देण्यात आलेल्या कर्जाची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशोक चव्हाण यांनी आजच्या दैनिक समानामध्ये आकृती बिल्डरसह रॉयल पाम, मोतीवाला, नागार्जुन आदी 35 ते 38 बांधकाम विकासकांच्या जाहिराती छापण्यात आल्या आहेत याकडे लक्ष वेधले. या बांधकाम विकासकांवर आक्षेप असताना त्यांच्या जाहिराती स्वीकारणार नाही अशी नैतिकता विरोधकांनी दाखवायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याचे शिवसेनेचे आमदार संतप्त झाले. आजच्या जाहिराती या ‘अशोक पर्वा‘च्या नाहीत असे सांगून शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी चव्हाण यांच्या हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्यावतीने काल मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला अशोक चव्हाण यांनी आज उत्तर दिले. या उत्तराच्यावेळी अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात जुगलबंदी रंगली. आकृती आणि रूचिप्रिया डेव्हलपर्सवर मेहेरनजर दाखवल्याने हजारो कोटी रूपयांचा घोटाळा झाला असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे खडसे यांनी सांगितले. या पुराव्यांच्याआधारे खडसे यांनी विधिमंडळाच्या सदस्यांकडून जमीन घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. मात्र, अशोक चव्हाण यांनी अशाप्रकारच्या चौकशीस साफ नकार देत कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल आणि जे बांधकाम प्रकल्प आक्षेपार्ह असतील ते थांबवले जातील, असे सांगितले.


प्रिंट काढा