Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 19:05:50 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | हिंदकेसरी माने यांचे निधन
हिंदकेसरी माने यांचे निधन
Sangali(28-July-2010)
Tags : National,Maharashtra
 

सांगली, दि. 27 - हिंदकेसरी, माजी खासदार मारुती माने (वय 72) यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. महिनाभरापासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. रक्तातील प्लेटलेटस् कमी झाल्यामुळे त्यांना महिन्याभरापूर्वी मिरज येथील सिद्धीविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सारखा चढ-उतार होत होता. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कुस्तीला सुरुवात केली. कुस्तीत प्राविण्य मिळवत आशियायी स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि मानाचा हिंदकेसरी किताब मिळविला. तसेच त्यांनी ध्यानचंद पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळवले. त्या शिवाय त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, आदी पदांवर त्यांनी काम केले होते.


प्रिंट काढा