नाशिक,दि.27(प्रतिनिधी)- मराठी माध्यमातील मुलांना शिक्षण, नोकरीसाठी केवळ इंग्रजीमुळे अनंत अडचणी येतात. मात्र खांडबहाले यांच्या डिक्शनरीमुळे इंग्रजीचा अडथळा दूर हाऊन तरुणांनाही त्याचा फायदा होईल असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले.
महिरावणी (नाशिक)चे सुपुत्र सुनील खांडबहाले यांनी तयार केलेल्या जगातल्या पहिल्या इंग्रजी-मराठी मोबाईल डिक्शनरीचे वितरण आज बालगणेश फौंडेशनमध्ये करण्यात आले.त्यावेळी बोरस्ते बोलत होते. ते म्हणाले की शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दहा हजार युवकांना या डिक्शनरीचे मोफत वितरण केले जाणार असून लवकरच शिवसेनेच्या वतीने राज्यभरात हा उपक्रम राबवला जाणार आहे. मराठीच्या मुद्यावर सर्वत्र तावातावाने चर्चा केली जाते मात्र त्यावर प्रत्यक्षात कृती कोठेही होत नाही. व्यवसाय असो किंवा शिक्षण या डिक्शनरीच्या माध्यमातून मराठी माणूस सक्षम होण्यास मदत होणार आहे. लवकरच हा उपक्रम राज्यभर राबविला जाणार असल्याचे बोरस्ते म्हणाले.
यावेळी माजी सभागृह नेते चंद्रकात खोडे,अमित कातकाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
|