Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 19:40:02 hrs

मुख्य पान | आंतरराष्ट्रीय | लंडनमध्ये मैदानावर उल्कापात
लंडनमध्ये मैदानावर उल्कापात
लंडन, (वृत्तसंस्था) - (28-July-2010)
Tags : International
 

लंडन, (वृत्तसंस्था) - मिडिलसेक्स आणि ससेक्स यांच्यात सुरु असलेल्या काउंटी सामन्यादरम्यान दर्शकांना एक अद्भूत दृश्य पाहण्यास मिळाले. जवळपास साडे चार अब्ज वर्षापूर्वीचा एका उल्केचा ढिगारा जलदगतीने मैदानाच्या दिशेने येऊन सीमारेषेच्या आत पडला. द डेली टेलिग्राङ्गनुसार हा उल्कापात काही इंच लांब आणि साडे चार अब्ज वर्ष जुना होता. इंग्लंडचा खेळाडू ल्यूक राइट जेव्हा मोंटी पनेसरसोबत ङ्गलंदाजी करत होता. तेव्हा काळ्या रंगाचा पाच इंच लांब दगड जलदगतीने मैदानावर येऊन धडकला. वृत्तपत्राने प्रत्यक्षदशाअच्या हवाल्याने सांगितले की, आम्ही तेव्हा सीमेरेषेजवळ बसलेलो होतो. जेव्हा अचानक आकाशातून आम्ही आमच्याकडे काळी वस्तु येत असल्याचे पाहिले. हा उल्कापात सीमारेषेच्या आत पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजचे उल्कापात विशेषज्ञ डॉ. मॅथ्यू गेंजेने सांगितले की, जर हे खरे असेल तर 1992 नंतर बि—टनमध्ये पडणारा हा पहिला उल्कापात असेल.


प्रिंट काढा