जळगाव,दि.27(प्रतिनिधी)- जिल्ह्यात यंदा 2009-10 या वर्षात 1 हजार शेततळ्यांच्या लक्षांका पैकी 368 ठिकाणी शेततळ्यांची कामे झाली असून त्यापैकी 309 शेतकर्यांना 2 कोटी 19 लाख 15 हजार रुपयायंचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्ंगत जिल्ह्यात सुरु वर्षासाठी 1 हजार शेततळ्यांचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. त्यापैकी कृषी विभागामार्फत तालुक्यानुसार वेगवेगळे उद्दीष्ट ठेवण्यात आले ओहे. जिल्ह्यात पुर्ण झालेले शेततळ्यांची कामे कंसात उद्दीष्ट जळगाव 27 (70) 14.44 लाख, भुसावळ (49 (10) 2.33 लाख, बोदवड 23 (30) 14.05 लाख, यावल 37 (75) 23.88 लाख, रावेर 22 (92) 5.26 लाख, मुक्ताईनगर 25 (52) 11.49 लाख, अमळनेर 25 (65) 54.05 लाख, पारोळा 28 (510 10.65 लाख, एरंडोल 19 (45) 7.05 लाख, धरणगाव 29 (48) 23.63 लाख, चोपडा 33 (80) 23.21 लाख, पाचोरा 30 (80) 17.11 लाख, भडगाव 16 (54) 7.32 लाख, चाळीसगाव 44 (100) 21.41 लाख, तर जामनेर तालुक्यात 53 शेततळी पुर्ण झाली आहेत. या तालुक्यात 109 शेततळ्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. पुर्ण कामांसाठी 23.32 लाखाचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. |