Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:57:09 hrs

जळगाव
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | जळगाव | नवव्या वर्षी ‘ती’ झाली एमएससीआयटी उत्तीर्ण
नवव्या वर्षी ‘ती’ झाली एमएससीआयटी उत्तीर्ण
जळगाव,दि.27(प्रतिनिधी)- (28-July-2010)
Tags : Jalgaon
 

जळगाव,दि.27(प्रतिनिधी)- ज्ञानाची ओढ असली तरी वयाचे बंधनही गळून पडते असे म्हणतात. सध्याच्या पिढीतील शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पाहता तर वयासह सर्वच मर्यादा पडू लागल्या असल्याचे दिसते. याचाच प्रत्यय जळगावातील सलोनी जितेंद्र लाठी या चिमुरडीने अवघ्या नवव्या वर्षी एमएससीआयटी ही संगणक ज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण होत आणून दिला. सद्यस्थितीत टीव्हीवरील शो असो किंवा प्रत्यक्ष जीवन लहान मुलांच्या करामती सर्वांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडतात. तसेच काही छोटे उस्ताद कठीण समजल्या जाणार्‍या स्पर्धा परीक्षांमध्येही कमी वयात यश संपादन करुन आपली चमक दाखवतात. अशीच महाराष्ट्र शासनाची संगणकीय ज्ञानाची अधिकृत परीक्षा असणारी एमएससीआयटी ही परीक्षा भल्याभल्यांना पास होणे कठीण वाटते. मात्र याच परीक्षेत सलोनीने 74 टक्के गुण मिळवून आपली चमक सिध्द केली आहे. सेंेट जोसेफ विद्यालयाची विद्यार्थीनी असणार्‍या सलोनीस सॉफ्टएड कॉम्प्यूटरच्या शितल भोलाणे, भुवनेश्वरी कुलकर्णी, योगेश कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.


प्रिंट काढा