Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 20:06:51 hrs

धुळे
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | धुळे | उद्योगांसाठी मदत - जिल्हाधिकारी
उद्योगांसाठी मदत - जिल्हाधिकारी
धुळे, दि. 27 (प्रतिनिधी) -(28-July-2010)
Tags : Dhule,Regional
 

धुळे, दि. 27 (प्रतिनिधी) - जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी लहान मोठे उद्योग सुरु करावेत यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोकूळ मवारे यांनी केले. गरुड वाचनालयाच्या सभागृहात एक दिवशीय सुशिक्षित बेरोजगार मेळावा व स्वयंरोजगार विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे दिपप्रज्वलन करुन उदघाटन जिल्हाधिकारी मवारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. कुशवाह यांच्याहस्ते झाले. यावेळी उद्योग सहसंचालक व्ही. एम. भगत, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिष भामरे, संचालक उद्योजक विकास केंद्र औरंगाबादचे दिलीप भिंगरदेव उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगारांनी जीवनातील तीन ध्येय लक्षात ठेवावे आरोग्य, शिक्षण व रोजगार हे तीनही जर मिळाले तर आपोआपच आपली प्रगती साध्य होईल. सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बॅकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. परंतू नंतर कर्जाची परत फेड होत नाही. सुशिक्षित बेरोजगारांनी असे न करता वेळेवर कर्जाची परतफेड केली तर बॅकांही वेळेवर कर्ज मंजूर करतील यासाठी घेतलेले कर्ज फेडणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी लुपीन फांऊडेशन या संस्थेकडून 500 कोटी रुपये मिळणार असून त्यात रोजगारासाठी 300 कोटी शिक्षणासाठी 100 कोटी व आरोग्यासाठी 100 कोटी मिळणार असून चारही तालुक्यातील दहा दहा गावांचा सर्वागिण विकास साध्य होणार असून या निधीतून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी संागितले. यावेळी कुशवाह म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न शासनास चांगले माहित असून सुशििाक्षत बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देवू तसेच बॅकांच्या अधिकार्‍यांना सुचना करुन सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज मंजूरीचे प्रकरणे ताबडतोब मंजूर करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी संागीतले. सुशिक्षित बेरोजगार उद्योग धंदयाच्या माध्यमातून पुढे आला तर इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.


प्रिंट काढा