Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:29:08 hrs

धुळे
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | धुळे | गुरे चोरणारी टोळी गजाआड,गुरांसह पीकअप व्हॅन जप्त; पाच जणंाना अटक
गुरे चोरणारी टोळी गजाआड,गुरांसह पीकअप व्हॅन जप्त; पाच जणंाना अटक
धुळे, दि. 27 (प्रतिनिधी) -(28-July-2010)
Tags : Dhule,Crime
 

धुळे, दि. 27 (प्रतिनिधी) - जनावरे चोरी करणारी टोळी बोरकुंड - रतनपुरा ग्रामस्थांच्या समय सूचकतेमुळे उघडकीस आली असून तालुका पोलिसांनी जनावरांसह पिकअप व्हॅन जप्त केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील जनावरे चोरीच्या घटनेत वाढ होती. याबाबत पोलिस दप्तरीही नोंद करण्यात आली. पण जनावरे चोरी करणारे पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे चोरटे पकडण्याचे मोठे आव्हान होते. बोरकुंड रतनपुरा शिवारात भगवान भिवसन महाजन यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात जनावरांसाठी गोठा बांधण्यात आला आहे. काल रात्री या गोठ्यातून 2 गाई आणि एक बैल चोरुन एम.एच. 19 - एस. 1304 क्रमांकाच्या पिकअप व्हॅनमधून चोरटे घेवून जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत जनावरे आढळून आली. याबाबत व्हॅन चालकाकडे ग्रामस्थांनी चौकशी केली असता, त्याने उडवाउडीवीची उत्तरे दिली. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय वाढत गेला व त्यांनी सदर माहिती पोलिस यंत्रणेला दिली. पोलिसांनी चौकशी केली असता जनावरे चोरी करणारी टोळी उघडकीस आली. पोलिसांनी एम. एच. 19 -एस. 1304 क्रमांकाची व्हॅन, दोन गायी, एक बैल असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत भगवान भिवसन महाजन यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. भादंवि 379, 34 प्रमाणे नितीन मनोहर गणकेसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी नितीन मनोहर गणके, प्रविण शांताराम निकम, भरत फकिरा मोहीते सर्व रा. धुळे, दिलीप पोपट सोनवणे, रतिलाल फुला देवरे दोघे रा. करमुडे ता. चाळीसगाव या पाच जणांना अटक केली. यातून अजून जनावरे चोरी करण्याच्या अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जनावरे चोरी करणारे चोरटे पोलिसांना सापडले नाही. परंतु ग्रामस्थांनी टोळी उघडकीस आणली आहे. आता तरी पोलिस यंत्रणेने खोलात जावून तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


प्रिंट काढा