नंदुरबार (प्रतिनिधी)-येथील जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकार्यांसाठी सेवार्थ प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात संपन्न झालेल्या कार्यशाळेस जिल्ह्यातील बहुसंख्य आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रभारी कोषागार अधिकारी महेश घोडके यांनी सेवार्थ प्रणालीची उपयुक्तता व अप्पर कोषागार अधिकारी डॉ.दिनेश मेतकर यांनी उपस्थितांना सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण दिले. सत्राच्या शेवटी आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचार्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तांत्रिक अडचणींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळेस उपकोषागार अधिकारी भगवान कोळपे व त्यांच्या सहकारी यांनी तांत्रिक सहकार्य केले. प्रशिक्षणाचा ङ्गायदा घेऊन जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनी आपले देय जुलै-ऑगस्ट 2010 चे वेतन देयक सेवार्थ प्रणालीतुनच सादर करण्याचे आवाहन प्रभारी कोषागार अधिकारी महेश घोडके यांनी केले आहे. |