सोहराबुद्दिन बनावट चकमक खटल्यातील एक आरोपी तसेच माजी पोलिस अधिकारी एन के अमिन यांनी माङ्गीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवल्याने गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शहा अधिकच अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमिन माङ्गीचे साक्षीदार झाल्यास सीबीआयची बाजू अधिक बळकट होणार आहे. गुजरातमधील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी सोहराबुद्दिन बनावट चकमक खटल्यात आरोपी आहेत. आणखी दोन पोलिस अधिकार्यांना चौकशीसाठी सीबीआयने बोलवले आहे.