Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:38:49 hrs

मुख्य पान | चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक
चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक
कोलंबो (30-July-2010)
Tags : International,Sports
 

कोलंबो, दि. 29 - संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनने लंकेविरुद्ध आज पाचवे द्विशतक ठोकले, तर सुरेश रैनाने कसोटी पदार्पणातच शतक झळकावून ‘हम भी है कमाल के’ याचा प्रत्यय आणून दिला. यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 9 बाद 669 धावा केल्या होत्या. सचिनचे हे कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. सचिन कोलंबो कसोटीत भारताला दोन मोठे धक्के बसल्यानंतर फलंदाजीस उतरला. भारतीय डावाला सावरत त्याने द्विशतकच ठोकले. सचिनने 203 धावा काढण्यासाठी 347 चेंडू खेळला 23 चौकार व एक षटकार त्याने लगावला. सचिनने आपल्या प्रतिभेच्या जोरावर फलंदाजी करीत असताना खराब चेंडूवर चौकार हाणले. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा भारतीय संघांला गरज असातना उत्कृष्ट खेळी केली आहे. कोलंबो कसोटीत पहिल्या डावात श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारल्याने भारतावर सलग दुसरा कसोटी सामना वाचविण्यासाठी मोठा दबाव होता. परंतु मास्टर ब्लॉस्टरने सुरुवातीला सुरेश रैना आणि नंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोबत खेळताना श्रीलंकंन गोलंदाजी चांगलीच धुलाई केली. सचिनने कोलंबो कोटीतील द्विशतक व्यतिरिक्त आणखी चार द्विशतक केले आहे. त्याचे हे पाचवे द्विशतक आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक 1999 मध्ये न्युझीलंड विरुध्द सरदार पटेल स्टेडियमवर केले. या दरम्यान त्याने तब्बल 35 चौकार हाणले. बर्‍याच दिवसांनंतर सचिनने पुन्हा एकदा श्रीलंकेविरोधात द्विशतक केल्याने तो आता पॉंटिंग व गावस्करच्या रांगेत पोहचला आहे.


प्रिंट काढा