|
| वीज पडून 1 ठार; दोघे चिंताजनक |
|
| कोल्हार, दि.10 (वार्ताहर)- (11-March-2010) |
Tags : Ahmednagar,News,Regional,Maharashtra |
श्रीरामपूर तालु्नयातील कडीत बुद्रुक येथे वीज पडून एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.10) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त मुले हे दहावीचे विद्यार्थी असून, सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने ते अभ्यासासाठी प्रवरा नदीपात्रालगत असणार्या झाडाखाली अभ्यास करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेेने कडीत बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातग्रस्तांमध्ये सागर गहिनीनाथ होन (16, रा. कडीत बुद्रुक या विद्यार्थ्याच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला, तर अक्षय जयवंत गुरसळ (16) याचे शरीर विजेचा जाळ लागल्याने भाजले. त्याचबरोबर बबन बर्डे (16) या विद्यार्थ्याच्या डोळ्याला इजा झाली असून, त्याचे शरीरही भाजले आहे. दहावीचा आजचा पेपर संपल्यानंतर उद्याच्या पेपरची तयारी करत असतानाच अचानक आभाळ भरून आले व जोराचा वारा सुटला म्हणून हे तिघे घरी निघाले असतानाच या मुलांवर काळाने झडप घालत एकाचा जीव घेतला. मृत झालेला सागर हा आई-वडिलांना एकटाच होता. या घटनेने सगळीकडे हळहळ व्य्नत होत आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|