|
| ‘टिंग्या’ला मिळणार नवे पालक |
|
| पारनेर, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010) |
Tags : Ahmednagar,News,Maharashtra |
- ‘टिंग्या’फेम शरद गोयेकरच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी स्वीकारल्याने ‘टिंग्या’ला आता नवे पालक मिळाले असून, त्याच्या शिक्षणाच्या प्रश्नावरदेखील पडदाच पडला आहे. खा. आढळराव यांनीच आज ही माहिती ‘देशदूत’शी बोलताना दिली.
‘टिंग्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आल्यानंतर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी पुण्याच्या प्रिया व प्रकाश पाटील या दाम्पत्याने स्वीकारली होती. परंतु, पाटील दाम्पत्य व ‘टिंग्या’चे वडील यांच्यात वाद निर्माण झाला होता. याबाबत ‘देशदूत’ने वारंवार आवाज उठविला होता. या वादानंतर ‘टिंग्या’च्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला होता. मात्र ‘टिंग्या’चे वास्तव्य असणार्या राजुरी (ता. जुन्नर) या मतदारसंघातील खासदार आढळराव यांनी स्वीकारली आहे. ‘देशदूत’शी बोलताना याबाबत दुजोरा देवून सध्या लोकसभा अधिवेशनानिमित्ताने आपण दिल्लीत आहोत. यानंतर रविवारी टिंग्याच्या पालकांशी चर्चा करून पुढील शिक्षणाबाबतची निश्चित दिशा ठरविणार असल्याचेही खा. आढळराव म्हणाले. |
प्रिंट काढा |
|
|
|