- जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात शहर पोलिसांना यश आले असून, ते केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपविल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्या संशयिताकडून महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असा पोलिसांचा कयास आहे. जर्मन बेकरीतील स्फोटाशी संबंधित संशयित व्यक्ती विविध माध्यमांतून निष्पन्न झाली आहे. त्या आधारे पोलिसांनी रेखाचित्र तयार करून त्याची माहिती संकलित केली.