Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:43:35 hrs

मुख्य पान | कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’
कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’
अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional
 

- आजवर आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ असलेल कृषी विभागही ग्लोबल रूपडे धारण करू लागला आहे. व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसगच्या जाळ्याने जिल्ह्याचा कृषी विभाग जोडला जाणार असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून थेट तालुका कृषी अधिकार्‍यांशी या प्रणालीद्वारे संवाद साधला जाणार आहे. एवढेच काय तर खेड्यातला शेतकरीही राज्याच्या व देशाच्या कृषिमंत्र्यांंशीही थेट व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसगने संवाद साधू शकणार आहे व आपल्या प्रश्नांबाबत थेट कृषिमंत्र्यांकडे दाद मागू शकणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिलकुमार घावटे व ‘आत्मा’चे कृषी उपसंचालक संभाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने ही प्रणाली राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ते तालुका कृषी अधिकारी व चारही उपविभागीय कार्यालय आता व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसगने जोडण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. ‘आत्मा’च्या माध्यमातून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. राज्यात पहिल्यांदाच नगर च्या कृषी विभागाकडून व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसग प्रणाली राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनासह चारही उपविभागांत व जिल्ह्यातील चौदाही तालुका कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात संगणक व इंटरनेटची व्यवस्था आहे. त्यामुळे व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसग प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा कृषी अधिकार्‍यांकडे दरमहा तीन ते चार बैठका होतात. या बैठकांसाठी तालुका कृषी अधिकार्‍यांना नगरला यावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसाही वाया जातो. हा वेळ वाचविण्यासाठीच व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसग प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून चार ऐवजी एकच बैठक होणार आहे. त्याबरोबरच तालुका पातळीवर होणार्‍या मंडल कृषी अधिकार्‍यांच्या बैठकीचीही माहिती मिळणार आहे. तसेच मंडल कृषी अधिकार्‍यांबरोबरही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना संवाद साधता येणार आहे. या प्रणालीमुळे कृषी अधिकार्‍यांना थेट तळागाळाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शेतकर्‍यांनाही जिल्हास्तरावर अधिकार्‍यांशी संवाद करता येणार आहे. तसेच एखाद्या पिकांबाबत प्रात्यक्षिकही दाखविता येणार आहे. तालुका आणि उपविभागाबरोबरच बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माहिती व जनसंपर्क कार्यालयालाही ही प्रणाली जोडण्यात येणार आहे. त्यामुळे विज्ञान केंद्र व विद्यापीठातील शास्त्रज्ञांबरोबरही संवाद साधून येणार्‍या अडचणींची सोडवणूक करता येणार आहे. त्याबरोबरच पुणे येथील कृषी संचालकांच्या कार्यालयाला ही प्रणाली जोडण्यात येणार असल्याने कृषी संचालकांनाही जिल्ह्यात कोठेही संवाद साधण्यास मदत होणार आहे. शेतकर्‍यांनाही अधिकारी आणि थेट मंत्र्यांबरोबरच संवाद साधण्याची व्यवस्था त्यातून करण्यात येणार आहे. तालु्नयाच्या ठिकाणी शेतकरी आल्यानंतर व कृषिमंत्र्यांची वेळ घेतल्यानंतर व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसग प्रणालीद्वारे शेतकरी मंत्र्यांबरोबर चर्चा करून शकतात. राज्यात पहिल्यांदाच अशी प्रणाली राबविण्यात येत असून कृषी विभागात यापूर्वीच शेतकर्‍यांच्या दारी गेला आहे, आता या प्रणालीमुळे येणार्‍या अडचणी आणि प्रश्नांबाबत माहिती थेट घेता येणार आहे. येत्या सोमवारी ही प्रणाली कार्यान्वित होणार असून सध्या तिचे काम सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


प्रिंट काढा