- डावखुरा जलद गोलंदाज नुवान जोयसाला या वर्षी एप्रिल-मे दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये होणार्या 20-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. निवड समितीने घरगुती स्पर्धेत सामान्य कामगिरी असलेल्या जोयसाला एक संधी दिली आहे, तर वायंम्बा संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी करणारा फलंदाज जीवंत कुलातुंगाला संघातून डावलण्यात आले आहे. यष्टिरक्षक फलंदाज दिनेश चांदीमल, तिसारा परेरा आणि लाहीरू तिरीमान्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे.
संभाव्य संघ - कुमार संगकारा, महेला जयवर्धने, चमारा कापूगेदरा, एंजेलो मॅथ्यूज, चिंतका जयसिंगे, तिसारा परेरा, मुथ्थया मुरलीधरन, अजंता मेंडीस, सूरज रणदीव, लसित मल्लिंगा, सुरंग लकमल, चनाका वेलेगेदरा, दीलहारा फर्नांडो, नुवान कुलशेखरा, थिलीना तुषारा, फरवेज महरूप, इसुरू उदना, मलिंगा बंडारा, माहेला उदावते, लाहीरू तिरीमान्ने, दीनेश चांदीमल, पुष्पकुमार, चमारा सिल्वा, उपुल थरंगा, जिवन मेंडीस, नुवान जोयसा. |