Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:40:53 hrs

मुख्य पान | ‘त्या’ साधूंना फाशी द्यावी ः रामदेवबाबा
‘त्या’ साधूंना फाशी द्यावी ः रामदेवबाबा
सिमला, दि. 10 (वृत्तसंस्था) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime,National
 

- महिलेचा विनयभंग करणार्‍या तथाकथित साधूंना फाशी देण्यात यावी, अशी मागणी पतंजली योगपीठाचे संस्थापक आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी केली आहे. बंगळूरूमध्ये अलिकडेच एका धार्मिक नेत्याची कृष्णकृत्ये उघड झाल्याबद्दल, त्यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारच्या तोतया साधूंवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख पथकाची स्थापना केली पाहिजे, अशी सूचना करून ते म्हणाले, असे लोक भगवे वस्त्र घालून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करत असतात. हिंदू धार्मिक नेत्यांची शिस्तभंग पंचायत किंवा आखाडा अस्तित्वात आहे. या पंचायतीमार्फत गुन्हेगाराला शिक्षा देण्यात येते. मात्र गुन्हेगारी वृत्तीचे अनेक लोक, अटक टाळण्यासाठी भगव्या वस्त्रांचा आडोसा घेताना दिसत आहेत. राज्यसभेत मंगळवारी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पुरुषांपेक्षा महिला कमी भ्रष्टाचारी असतात. राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाल्यास देशाचे भवितव्य बदलण्याची शक्यता आहे. महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या कल्याणासाठी सर्व क्षेत्रात सक्रिय आहेत, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.


प्रिंट काढा