|
|
|
|
| मुख्य पान | अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत |
| अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत |
|
| मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
- विधिमंडळातील अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिगर आदिवासी सदस्याची नेमणूक केली असून, या नेमणुकीस आदिवासी आमदारांनी हरकत घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव पाटील यांनी विधिमंडळातील तीस विविध समित्यांवरील नेमणुकांची घोषणा केली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. सुरेश धस यांची नेमणूक आदिवासी समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. मात्र धस हे मराठा समाजातील असून आदिवासी मंत्री म्हणूनही राष्ट्रवादीचे बिगर आदिवासी व मराठा नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
या संदर्भात आदिवासी आमदारांमध्ये नाराजी असतानाच आता विधिमंडळ समितीचे अध्यक्षपदही बिगर आदिवासी आमदारांकडे देण्यात आले. याबद्दल आदिवासी आमदारांत अस्वस्थता पसरली आहे. राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर भर सभेत निषेध नोंदविला. हे आमदार आता विधानसभाध्यक्ष व सभापतींकडेही आपले गार्हाणे मांडणार आहेत. विधिमंडळातील लेखा समिती या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची नियु्नती झाली आहे.
|
प्रिंट काढा |
|
|
|