- मुंबईसह राज्यात अनेक सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत भांडूप, कांजूरमार्ग, मुलूंड येथे पावसाच्या हल्नया सरी कोसळल्या. राज्यात अहमदनगर, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, औरंगाबाद, जालना, खामगाव, जळगाव आणि बुलढाणा आदी ठिकाणी पाऊस पडला.
अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्याचवेळी आंबा, कापूस, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालु्नयात अंगावर वीज पडून विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली.
|