|
|
|
|
| मुख्य पान | पूर्ववैमनस्यातून बालकाची निर्घृण हत्या |
| पूर्ववैमनस्यातून बालकाची निर्घृण हत्या |
|
| भंडारा, दि.10 (प्रतिनिधी)- (11-March-2010) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional,Maharashtra |
शेजारी राहणार्या युवकाने कौटुंबिक वैमनस्यातून उकळत्या कढीच्या गंजात टाकलेल्या तीन वर्षांच्या बालकाचा मंगळवारी मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे काही दिवसापूर्वी ही घटना झाली होती.
येथील विश्वनाथ बावनकुळे नावाच्या तरुणाचे त्याच्या शेजारी राहणार्या सुरेश राऊत यांच्याशी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. तरीही विश्वनाथ हा राऊत यांचा मुलगा आदित्य याला खेळवायचा. सुमारे दोन आठवड्यापूर्वी विश्वनाथच्या गावातील नातेवाईकाकडे साक्षगंधाचा कार्यक्रम होता. सायंकाळी जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना विश्वनाथने अंगणात खेळत असलेल्या आदित्यला बळजबरीने उचलून नेले. मद्यधुंद अवस्थेतील विश्वनाथने आदित्यला घराच्या मागील बाजूस नेऊन उकळत्या कढीच्या गंजात टाकले. यावेळी विश्वनाथचा हातही भाजला. स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या लोकांनी आदित्यला बाहेर काढले. 60 टक्के भाजलेल्या आदित्यला प्रथम लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून नंतर, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात हलवण्यात आले होते. गेले दोन आठवडे आदित्यवर उपचार चालले होते. |
प्रिंट काढा |
|
|
|