Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:23:25 hrs

मुख्य पान | पालकमंत्र्यांची श्रीक्षेत्र देवगडला भेट
पालकमंत्र्यांची श्रीक्षेत्र देवगडला भेट
नेवासा, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Political
 

- येथील शासकीय दौरा आटोपून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बबनराव पाचपुते यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे सुरू असलेल्या श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी सोहळ्याला भेट दिली. ना. पाचपुते यांनी श्रीदत्त मंदिर तसेच श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची त्यांनी माहिती घेतली. या प्रसंगी ह.भ.प. भास्करगिरी महाराजांच्या हस्ते ना. पाचपुते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्यासमवेत आ. शंकरराव गडाख, प्रांताधिकारी सौ. गीतांजली बावीस्कर, तहसीलदार डॉ. बी. राधाकृष्णन उपस्थित होते. पाचपुते यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत. मात्र, देवगड देवस्थान स्वच्छ व निसर्गरम्य आहे. प.पू. भास्करगिरी महाराजांच्या कृपेने इथला विकास भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने चांगला होत आहे. संस्थानला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन देवगड फाट्यावरील सुशोभीकरण तसेच दुकानांच्या अतिक्रमणाबाबत लक्ष घालावे, असे ना. पाचपुते म्हणाले. यावेळी बजरंग विधाते, लक्ष्मणराव वरखडे, अंबादास फोलाने, श्रीधर जाधव, मारुती साबळे, निवृत्ती सुडके, ज्ञानदेव लोखंडे, चांगदेव साबळे, ह.भ.प. बाळासाहेब सुकासे, ह.भ.प. बाळासाहेब कानडे, मनोज पवार, संदीप साबळे, कामगार तलाठी श्यामराव जमधाडे, ग्रामसेवक भाऊसाहेब पटारे, पोलिस पाटील पोपटराव वरखडे आदी उपस्थित होते.


प्रिंट काढा