- सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर होणार्या कॉपीला आवर घालण्याची मागणी एकीकडे होत असताना येथील जिजामाता विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा व्यवस्थापनाच्या शिथिल कारभारामुळे राजरोसपणे विद्यार्थी कॉपी करीत आहेत. हुशार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत असून, या केंद्राबद्दल पालकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही पालकांनी या केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालु्नयामध्ये एकेकाळी जिजामाता विद्यालयाचे दहावीचे परीक्षा केंद्र शिस्तप्रिय म्हणून ओळखले जात होते. मात्र, केंद्र संचालकांच्या शिथिल कारभारामुळे आणि कॉपीबहाद्दरांच्या त्रासाने या केंद्राचा दर्जा ढासळल्याचे दिसून येत आहे. केंद्र संचालकांकडून केंद्रावर नसणार्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे काम केले जात आहे. कॉपीबहाद्दर येथील शिक्षक, शिपाई आणि नियंत्रण ठेवणार्या शासकीय अधिकार्यांना दमबाजी करून वर्गाबाहेरून काही विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत आहेत. या कॉपीबहाद्दरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. |