Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:35:46 hrs

मुख्य पान | देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ
देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ
देवळाली प्रवरा, दि. 10 (वार्ताहर) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime
 

- येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासातून पोलिसांना विश्रांती मिळते न मिळते, तोच देवळाली प्रवरात मंगळवार, दि. 9 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील 4 दुकाने फोडून 8 ते 9 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. देवळाली प्रवरा व परिसरात भुरट्या चोर्‍यांना ऊत आला असून, भुरट्या चोर्‍या झाल्यानंतरही पोलिसांची भानगड नको, म्हणून तक्रार दाखल करण्याचे टाळले जात आहे. शहरात मध्यंतरी मोठ्या चोर्‍या पूर्णतः थांबल्या होत्या. मंगळवारपासून पुन्हा चोरी करण्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे दिसत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवळाली प्रवरा बाजारतळावरील संतोष निमसे यांचे किराणा दुकान फोडून पुन्हा चोरी करण्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे दिसत आहे. मंगळवार, दि. 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देवळाली प्रवरा बाजारतळावरील संतोष निमसे यांचे किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी किराणा मालासह चैनीच्या वस्तू व रोख 500 रुपये, तर शिवाजी रेडिओ अॅण्ड वॉच, बाळासाहेब कराळे यांचे भगीरथ अॅटोमोबाईल्स या दुकानातून 6 हजार रुपये किमतीचे दुचाकीचे साहित्य, अंकूश घाडगे यांच्या भुवनेश्वरी वाहतूक या दुकानातून रोख रक्कम असा एकूण 7 ते 8 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. राहुरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक फौजदार मुत्याल हे करीत आहेत.


प्रिंट काढा