​‘बिग बॉग’च्या घरात अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न!

0

सध्या ‘बिग बॉग तामिळ’ने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

सध्या या शोची स्पर्धक ओविया हेलन  चर्चेत आहे. कधी ‘बिग बॉस’च्या घरातील भांडणांमुळे, कधी इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे ओविया चर्चेत होती. पण आता ओवियाने असे काही केले की, सगळीकडेच खळबळ माजली. यावेळी या शोमध्ये असे काही पाहायला मिळाले की, सगळ्यांनाच धक्का बसला.

ताज्या माहितीनुसार, ओवियाने ‘बिग बॉस’च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. आरव या प्रतिस्पर्धकाच्या वागण्यामुळे ती निराश होती आणि या नैराश्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते.

शुक्रवारी ओवियाने ‘बिग बॉस’च्या घरातील स्विमींग पूलमध्ये उडी घेतली आणि स्वत:ला डुंबवण्याचा प्रयत्न करू लागली.

रिपोर्ट्सनुसार, सहा आठवडे ‘बिग बॉस’च्या घरात राहणारी ओविया तिचा को-कंटेस्टंट आरववर भाळली होती. मात्र आरवने तिचा प्रेमप्रस्ताव नाकारला. यामुळेच नाराज होत, ओवियाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते.

या घटनेनंत पोलिसही ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचल्याचे म्हटले जातेय. अर्थात शोच्या मेकर्सनी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे.

या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कमल हसन ‘बिग बॉस’चे तामिळ व्हर्जन होस्ट करतो आहे.

LEAVE A REPLY

*