​‘नो एन्ट्री’मध्ये हृतिक रोशनची होणार ‘एन्ट्री’!!

0

२००५ मध्ये आलेला सलमान खानचा ‘नो एन्ट्री’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता.

अगदी तेव्हापासून या चित्रपटाचा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. अर्थात चर्चाच कारण, आजपर्यंत हा सीक्वल आलेला नाही. आता पुन्हा एकदा या सुपरडुपर हिट सिनेमाचा सीक्वल येणार, अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे.

लवकरच या चित्रपटाचा सीक्वल येणार, पण यात सलमान खान नाही तर दुस-याच एका हिरोची एन्ट्री होणार आहे, अशी बातमी आहे.

सलमानऐवजी हृतिक रोशन या चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. चर्चा खरी मानाल तर, दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी यासंदर्भात चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांच्याशी चर्चा केली आहे. हृतिक रोशनच्या या चित्रपटात एक नाही तर दोन भूमिका असतील. म्हणजेच, हृतिकचा यात डबलरोल असेल.

कदाचित अनीस बाज्मीने हा निर्णय यासाठीही घेतला असावा कारण, ‘नो एन्ट्री’ येऊन १२ वर्षांचा कालखंड झाला आहे. सध्या या चित्रपटातील ओरिजनल स्टारकास्टमधील बहुतांश कलाकार इंडस्ट्रीतून बाहेर पडले आहेत. केवळ सलमान खान आणि अनिल कपूर हे दोघे सोडले तर कुणीच इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह नाहीत.

यापैकी सलमानला घेऊन ‘नो एन्ट्री’चा सीक्वल आणायचा झाल्यास, त्याच्या तारखांचा मेळ घालावा लागणार. कारण तूर्तास सलमान त्याच्या चित्रपटांत बिझी आहे. ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलला तसाही विलंब होत आहे. त्यामुळे बज्मी यांनी हृतिकला पसंती दिली असावी. निश्चितपणे हृतिकसोबत अनीस बाज्मीची कॉमेडी पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. कारण अद्याप हृतिकने कुठलाही कॉमेडी सिनेमा केलेला नाही. गत १७ वर्षांच्या करिअरमध्ये तो एकाही विनोदीपटात दिसला नाही.

 

LEAVE A REPLY

*