०००१ या नंबरला तब्बल १६ लाख रूपये मोजले

0

दिल्लीत कार्ससाठी व्हिव्हीआयपी नंबर घेण्याची क्रेझ वाढत चालली आहे.

दिल्ली परिवहन विभागाने वेबसाईटवर या नंबर्सच्या लिलावाची माहिती देताच ०००१ या नंबरला तब्बल १६ लाख रूपये मोजले गेल्याचे समजते.

दिल्लीच्या पालम लँड हॉस्पिटॅलिटी प्रा.लिमिटेडकडून या नंबरची खरेदी झाली आहे.

परिवहन विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार यापूर्वी सर्वाधिक रक्कम १२.५० लाख नंबरसाठी मोजली गेली आहे.

सप्टेंबर २०१४ मध्ये ०००७ या नंबरसाठी १०.४० लाख रूपये तर फेब्रुवारी २०१५ मध्ये ०००९ या नंबरसाठी ८.५० लाख रूपये मोजले गेले होते.

गेल्या ६ महिन्यात दिल्ली परिवहन विभागाने २९ व्हीआयपी नंबर विकून ५४.७० लाख रूपयांची कमाई केली आहे. गतवर्षी १५१ नंबर विकून २.२८ कोटी रूपयांचा महसूल गोळा झाला होता.

 

LEAVE A REPLY

*