‘हॉस्टेल डेज’ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

अजय नाईक यांचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अजय नाईक यांनी बावरे प्रेम हे, लग्न पहावे करून, सतरंगी रे यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे.

ते आता एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे त्यांचेच आहे. तसेच या चित्रपटाची निर्मितीदेखील तेच करणार आहेत.

वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाचे नाव हॉस्टेल डेज असे असून या चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे.

या पोस्टरमध्ये अतिशय आनंदित असलेली मुले-मुली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सोबतच आयुष्यातले सगळ्यात मस्त क्षण अशी या चित्रपटाची टॅगलाइन आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळत आहे.
या पोस्टरसोबत अजय नाईक यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी आणि माझी टीम मिळून एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे. हा चित्रपट तुम्ही मिस करू नये असे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन.

या चित्रपटाचे नाव हॉस्टेल डेज असून या चित्रपटाद्वारे आपण 90च्या दशकात जाऊन काही जुन्या आठवणींमध्ये रमणार आहोत. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला काळ या चित्रपटामुळे तुम्हाला पुन्हा आठवणार आहे यात काही शंका नाही. या चित्रपटातील गाणी खूप छान असून या चित्रपटासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला हवा आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचे मी चित्रीकरण करायला सुरुवात करत आहे.

या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार आहेत याबाबत अजय नाईक यांनी मौन राखणेच पसंत केले आहे.

LEAVE A REPLY

*