हॉटेल यशांजलीवर पोलिसांचा छापा; रमाकांत गाडे पसार

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील महेश टॉकीज जवळील हॉटेल यशांजलीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी रात्री छापा टाकला.

1 लाख 60 हजारांची दारु छाप्यात जप्त करण्यात आली आहे. तसेच हॉटेल मॅनेजर हेमंत गिरवले यास अटक करण्यात आली असून हॉटेल मालक रमाकांत गाडे हे पसार झाले आहेत.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महेश टॉकीज परिसरात हॉटेल यशांजली येथे अवैध दारु विक्री होत असल्याची माहीती पोलीसि अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना या हॉटेलवर छापा टाकण्याचे आदेश दिले.

पवार यांच्या पथकाने यशांजलीवर छापा टाकला असता 1 लाख 64 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हेमंत पुंडलीक गिरवले यात अटक करण्यात आली असून हॉटेल मालक रमाकांत गाडे पसार झाला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, मन्सुर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, देवा काळे, रवींद्र कर्डीले, बर्डे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*