हायटेक बसस्थानकाची आमदार थोरातांकडून पाहणी

0

संगमनेर (प्रतिनिधी)ः- संगमनेर शहर हे शैक्षणिक, सहकार, आर्थिक व व्यापारी क्षेत्रातील प्रगतीमुळे झपाट्याने वाढले असून विविध क्षेत्रात माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक वाढला आहे.

 

 

शहराच्या वैभवात भर टाकणारी सर्वसुविधांयुक्त असे संगमनेरच्या नव्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

 

 

संगमनेर येथे नव्याने बांधण्यात येणार्‍या आधुनिक व भव्य एसटी बस स्थानकाच्या पाहणी प्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. हर्षल तांबे, अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, विश्‍वास मुर्तडक, जयवंत पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, रामहारी कातोरे, बी. आर. चकोर, श्याम भडांगे, सतिष आहेर, नवनाथ अरगडे, संतोष हासे, किशोर टोकसे, एस टी महामंडळाचे अमोल बनकर, पी. एस. देवकर, योगेश दिघे, साजिद पठाण, बाळासाहेब गोसावी, निखील कातोरे, गणेश गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांनी सर्व विभागांची पाहणी करून सूचना केल्या.

 

 

यावेळी आमदार थोरात म्हणाले कि, नव्याने अद्यावत होत असलेल्या बसस्थानक हे विकासाच्या दृष्टीने वैभवाचे पाऊल आहे. शहरात बायपास, प्रवरा नदीवर विविध पूल, जुन्या पुलास नवीन समांतर पुल, अद्यावत तहसील इमारत, प्रांत कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती ही वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहे. एसटी महामंडळ व विद्युत महामंडळ ही जनसामान्यांचे जिव्हाळ्याची आहेत.

 

 

एसटीने खर्‍या अर्थाने गोरगरिबांची सेवा केली आहे. नव्याने होत असलेले बसस्थानक हायटेक असून येणार्‍या 50 वर्षांचे नियोजन करुन हे बांधत आहोत.

 

 

सर्वसुविधांयुक्त असलेले हे बसस्थानक निश्‍चितपणे राज्यासाठी मॉडेल ठरेल असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचेही भाषण झाले. यावेळी शहरातील नागरिक, युवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*