हस्ती स्कूलचा 100 टक्के निकाल

दोंडाईचा । वि.प्र.-दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅन्ड ज्यु. कॉलेज या शाळेने एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत सलग 9व्या वर्षी 100 टक्के गुणवत्तायुक्त उत्कृष्ट निकालाची वैभवशाली परंपरा या वर्षीही कायम राखली.
एस.एस.सी.बोर्डपरिक्षेत एकुण 46 विद्यार्थी प्रविष्ट झाले होेते. या पैकी सोनाली महेश बोधवाणीहीने 98.60 टक्केगुणांसह दोंडाईचा शहरात प्रथम क्रमांक पटकावला तर अवनी प्रशांत पाठक हीने 98 टक्के गुण व स्नेहल सुधाकर पाटील हीने 96.40 टक्के गुण प्राप्त करीत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच 4 विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा जास्त, 14 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त, 11 विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा जास्त, 7 विद्यार्थ्यांनी 80 टक्केपेक्षा जास्त तर 9 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.

यात 5 विद्यार्थ्यांनी गणित विषयात व 3 विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात 100 पैकी 99 गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक यशवंत स्वर्गे, शालेय समितीचे अरमन कैलास जैन, व्हा.चेअरमन दिलीप वाघेला, हस्ती बँक संचालक प्रकाश कुचेरिया, शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, प्राचार्य एस.एन.पाटील, प्राचार्य पराग पोळयांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*