स्वाईन फ्ल्यूमुळे २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

0

पुणे/स्वाईन फ्ल्यूचे थैमान शहरात दिवसेंदिवस वाढतच आहे.

नुकत्याच एका 26 वर्षीय महिलेचा फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली.

यामुळे पुण्यात स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 45 वर जाऊन पोहोचली आहे.

मृत महिलेला 2 मे रोजी स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले होते.

त्यामुळे रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शहरात स्वाईन फ्ल्यू झालेल्या आणखी 21 जणांची प्रकृती गंभीर असून दरम्यान एकूण 2722 रुग्णांची स्वाईन फ्ल्यूची तपासणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*