स्वाईन फ्लू कक्षात 4 रूग्ण दाखल

0

नाशिक : पुण्यासह नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत चालाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या स्वाईन फ्लूकक्षामध्ये आज आणखी एक रुग्ण दाखल झाला असून या एकक्षातील रूग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कालपर्यंत (ता.19) एका पुरुषासह दोन महिला असे तीन स्वाईन फ्ल्युसंसर्ग रुग्ण दाखल झाले होते. काल रात्री उशिरा पंचवटी, रामवाडीतील एक पुरुष रुग्ण स्वाईन फ्ल्यु सदृश्य आजाराने दाखल झाला आहे. या रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले असून त्याचेही रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, तिघांचा तपासणी अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्यावर या विशेष कक्षामध्येच उपचार सुरू आहेत. तर दोन-तीन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोघांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांच्यावर औषधोपचार करून सोडून देण्यात आले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयामध्ये स्वाईन फ्ल्युसाठी दिल्या जाणार्‍या टॉमीफ्लूया गोळ्यांचा साठाही पुरेशाप्रमाणात असून जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही पुरवठा करण्यात आला असल्याने नागरीकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*