स्थायी समितीत भाजप-शिवसेना बरोबरीत तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश

0

जळगाव /जिल्हा परिषदेच्या सभापतीचे खाते वाटप व दहा विषय समित्यांच्या सदस्यांची निवड अध्यक्ष उज्वला पाटील यांनी तब्ब्ल 15 दिवसांनतर आज जाहीर केली आहे.

शिक्षण, क्रिडा व अर्थ समिती सभापतीपदी पोपट भोळे, आरोग्य सभापतीपदी दिलीप पाटील तर बांधकाम समिती सभापतीपदी रजनी चव्हाण यांची वर्णी लागली आहे.

स्थायी समितीत भाजप- शिवसेनेच्या तीन तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या सभापतीच्या खाते वाटप व विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेत सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी अध्यक्षांना सदस्य निवडीचे अधिकार दिले होते. त्यानंतर लागलीच सभा आटोपण्यात आली होती.

त्यानंतर तब्ब्ल 15 दिवसांनी आज अध्यक्षांनी विषय समित्यांच्या सदस्यांची निवड व सभापतींना खाटेवाटप केली असून बांधकाम सभापतीपदी ना.महाजन यांच्या गटातील रजनी चव्हाण यांची वर्णी लागली आहे.

आतापर्यंत उपाध्यक्ष यांच्याकडे बांधकाम व अर्थ समिती सभापती पद असायचे अध्यक्षांनी आज जाहीर केलेल्या विषय सामित्यांच्या खाते वाटपात आ. एकनाथराव खडसे यांच्या गटातील जि.पचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना डावलण्यात आले असून त्यांच्याकडे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*