सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या प्रश्नांवर शाहरूख खानचे स्पष्टीकरण

0

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा सर्वात लाडका मुलगा अबराम हा त्याचाच मोठा मुलगा आर्यन याच्यापासून जन्माला आल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. आता शाहरूखनेच या चर्चेला पूर्णविराम दिला असून, अशा चर्चा दुखदायक असल्याचे त्याने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या वेंकूवर येथील टेड टॉक २०१७ मध्ये शाहरूख एक वक्ता म्हणून सहभागी झाला होता. त्याचबरोबर या टेड टॉकमध्ये सहभागी होणारा शाहरूख हा पहिलाच कलाकारही ठरला. यादरम्यान त्याने आपल्या करिअरसह खासगी आयुष्यावरही त्याने मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. यावेळी त्याने इंटरनेटवर अबरामविषयी पसरविण्यात येत असलेल्या चर्चांचेही खंडन केले.

जेव्हा अबरामचा जन्म झाला होता, तेव्हा हा शाहरूखचा मुलगा नसून, शाहरूखचाच मोठा मुलगा आर्यनचा असल्याची चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या रिलीजअगोदर आर्यनचा एक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता. तेव्हापासून हे म्हटले जात होते की, अबराम हा आर्यनचाच मुलगा आहे. याविषयी शाहरूखने टेड टॉक शोमध्ये यामागचे वास्तव कथन केले.

शाहरूखने म्हणाला कि, चार वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी गौरी हिने तिसऱ्या मुलाबाबत विचार केला. मात्र इंटरनेटच्या उपकारामुळे अबराम माझ्या १५ वर्षांचा मुलगा आर्यनचा मुलगा असल्याचे सांगितले गेले. त्याचा पुरावा म्हणून आर्यनचा त्याच्या रोमानियन गर्लफ्रेण्डसोबत व्हिडीओही त्यावेळी व्हायरल केला गेला. आम्ही सर्वांनी हा व्हिडीओ बघितला तेव्हा खूपच दु:ख वाटले. या सगळ्या अफवा असून, त्या निराधार असल्याचेही शाहरूखने म्हटले.

LEAVE A REPLY

*