सोमय्याच्या कार्यकारी संचालकास महिला कर्मचार्‍यांकडून चपलेने मारहाण

0

पोलिसांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ ः महिला कर्मचार्‍यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

कोपरगांव (तालुका प्रतिनिधी)- सोमय्या उद्योग समुह गोदावरी बायोरिफायनरीज च्या कार्यकारी संचालक एस मोहन व हंगामी कर्मचार्‍यांत वादावादी झाल्यानंतर एस मोहन यांनी वापरलेल्या उद्धट व अपशब्दामुळे चिडलेल्या हंगामी महिला कामगारांनी एस मोहन यांना चपलांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने साकरवाडी, कान्हेगांव, वारी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संबंधी माहिती अशी की गोदावरी बायो रिफायनरीज कारखान्यात ठेकेदारामार्फत कोळसा व अन्य कामांसाठी 65 कंत्राटी कामगार कामावर आहेत. पैकी 32 महिला कामगार कामावर काढून टाकल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. यातील महिला कामगारांनी प्रथम ठेकेदार गायकवाड याचेकडे जाब विचारला, त्याने कार्यकारी संचालक एस. मोहन यांचेकडे बोट दाखविले. त्यामुळे या महिला कामगारांत मोहन यांचेबद्दल चिड निर्माण झाली.

मोहन यांच्या या अचानक निर्णयामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले. या कामगारांतील कांही मुलींची लग्ने ठरली तर काहींचे शैक्षणिक तसेच व्यावहारीक अडचणी निर्माण झाल्या. अचानक काम बंद होवून उत्पन्न बंद झाल्याने या सर्व महिला कामगार संघटीत झाल्या. त्यांनी गेटवर जावून एस मोहन याना जाब विचारण्याचे ठरवले. महिला कामगारांना सुरक्षा व्यवस्थेत गेटवरच अडवण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाला परवडत नसल्याने 32 महिला कर्मचार्‍यांना कमी केल्याचे मोहन यांनी ठेकेदार व महिलांना सांगितले. परंतु शब्दाने शब्द वाढला.

उलट या कामगारांना खोट्या केसेस करु आमचे वर पर्यंत संबंध आहेत मंत्री प्रकाश मेहता हे कारखान्यात कायम येतात तुम्हाला घरीच बसवतो म्हणून धमकावले व खोल्या खाली करण्यास सांगितले, महिला कामगारांचे लाईट व पाणी बंद करण्यची धमकी देण्यात आली. कामावर येण्यास नकार दिला रस्त्यावर उभे ठेवले, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ कली व जातीयवाचक शिवीगाळ करुन तुम्हारे बाप की कंपनी है क्या? असे म्हणून या महिला कामगारांचा अपमान केला. त्यामुळे संतप्त महिलांनी मोहन यांना तेथेच चपलांना बेदम मारहाण केली.

त्यानंतर सर्व 32 महिला कामगार कोपरगांव ग्रामिण पोलीस ठाण्यात गेले व सदर घटना सांगुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलीस निरिक्षक शहाजी नरसुडे यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवली. तेंव्हा या महिला कामगारांनी आपल्या कुटूंबियांसमवेत कोपरगांव ग्रामिण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला जोपर्यंत आमची फिर्याद घेत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान कारखान्याचे कार्यकारी संचालक एस मोहन यांनी या महिला कामगारां विरुद्ध कोपरगांव ग्रामिण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत फिर्याद नोंदण्याचे काम चालू होते. बाहेर कामगार ठिय्या धरुन बसले होते. त्यामुळे कारखाना व्यवस्थापन व या महिला कामगारांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात अशी प्रथमच घटना घडल्याने सर्वत्र या व्यवस्थापनाच्या दडपशाही बद्दल तोंड फुटले आहे. कमी केलेल्या या 32 महिला कर्मचार्‍यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*