सॉफ्टवेअर ठरवणार शिक्षकांच्या बदल्या

0
सोमवारी शिक्षणाधिकार्‍यांचा डेमो
अहमदनगर (प्रतिनिधी)-  यंदापासून शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत बदल मोठा बदल होणार आहे. शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सरकारने अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र निश्‍चित केले असून त्या आधारे शिक्षकांच्या बदल्या निश्‍चित करण्यात येणार आहे.

आता शिक्षकांच्या बदल्यासाठी ग्राम विकास विभागाने विशेष प्रणाली विकसीत केली असून या प्रणालीत एक सॉफ्टवेअर राहणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये असणार्‍या पर्यायानूसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.

ग्राम विकास विभागाने यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांना कल्पना दिलेली आहे. यात सॉफ्टवेअर संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. आता सोमवारी राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिवांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरंस आयोजित केली आहे. यात शिक्षकांच्या बदल्याच्या सॉफ्टवेअरचे डेमा करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्यासाठी कसा पध्दतीने प्रक्रिया राबवाची याची माहिती देण्यात येणार आहे.

1 मे ते 31 मे हा शिक्षकांच्या बदल्यांचा कालावधी राहणार आहे. या काळात शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यंदा शिक्षकांनी बदल्यासाठी कसा अर्ज कराचा यांची माहिती ग्रामविकास विभाग देणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

ग्रामविकास विभागाने यंदा शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात काढलेल्या नव्या आदेशाला शिक्षक संघटनाकडून मोठा विरोध होत आहे. राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने 26 तारखेला जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात जि.प. शाळेतील शिक्षकांसोबत नगरपालिका आणि महानगर पालिकेतील प्राथमिक शिक्षक सहभागी होणार असल्याची नगरपालिका व महानगर पालिका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*