सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांची मनमानी

0

नंदुरबार / नंदुरबार येथील सेट्रंल बँक ऑफ इंडीयाच्या व्यवस्थापकांनी मनमानी करून सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे व प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शनचे धनादेश न स्विकारल्याने पेन्शनरांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

संबंधित विभागात सुरू असणार्‍या कामकाजाविषयी कोणतीही माहिती मिळत नाही.

 

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचे व प्राथमिक शिक्षकांचे सेंट्रल बँक ऑफ इंडीया येथे खाते असल्याने शाखेचा नावाचा धनादेश तयार करून दरमहा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शनर्सचे धनादेश तयार करण्यात आले.

सदरचे धनादेश सेट्रंल बँक ऑफ इंडीयाच्या शाखेत जमा करण्यासाठी पाठविले असता शाखाधिकार्‍यांनी स्विकारले नाहीत. प्रत्येक पेन्शनधारकाचा स्वतंत्र धनादेश लिहिण्यात यावा, अशा सूचना शाखाधिकार्‍यांनी दिल्या.

खरेतर शासनाने सध्या पेरलेस प्रक्रिया राबवून ऑनलाईन प्रक्रियेला प्रोत्सासहन दिले आहेत. असे असले तरी संबंधित बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी तसे न करता स्वतंत्र धनादेशाच्या सूचना दिल्या.

शासनाच्या धोरणानुसार दरमहा एक तारखेस सेवानविृत्त वेतन देण्याच्या नियमाचेही शाखाधिकार्‍यांच्या अशा वर्तमाने उल्लंघन झाले आहे.

पेन्शनधारकांच्या खात्यावर वेळेवर पेन्शन जमा झालेली नाही. बँकेच्या दिरंगाईमुळे पेन्शनर्स पंचायत समितीच्या पेन्शनसाठी सारखे येरझार्‍या घालत असून समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 

LEAVE A REPLY

*