सुशिक्षित तरुणांना काँग्रेस पक्षात मानाचे स्थान : निखिल वारे

0

 हर्षवर्धन देशमुख यांचा सत्कार संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्ष हा विचारवंत, सतत कार्यरत असणार्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जेष्ठांबरोबरच तरुणांना या पक्षात स्थान आहे. वैचारिक व सुशिक्षित तरुणांना या पक्षात मानाचे स्थान मिळत आहे. या संधीचा ङ्गायदा घेवुन युवकांनी बलशाही भारत बनविण्यासाठी सदैव तत्पर रहावे, असे प्रतिपादन महारा्र युवक काँगे्रस सरचिटणीस व माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
अ.नगर लोकसभा काँग्रेसच्या जिल्हा युवक काँगे्रेस सरचिटणीसपदी हर्षवर्धन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वारे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्याच्या सरकारने सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, व्यापारी यांच्या तोंडला पाने पुसण्याचे काम केले आहे. त्यांना मदत करने दुरच परंतू वेगवेगळ्या ङ्गसव्या योजनांव्दारे अडवणूक करण्याचे काम हे सरकार करीत आहे.
नगर जिल्ह्यात सुजन विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना नवी दिशा देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरु आहे. हर्षवर्धन देशमुख सारख्या उमद्या कार्यकर्त्याला संधी देऊन पक्ष संघटना बळकट करुन काँग्रेसचे आचार-विचार नागरीकांपर्यत पोहोचवण्याचे काम पक्ष करीत आहे. भविष्यात निवडणुकांच्या दृीने पक्षाने कँबर कसली असून लवकरच अनेक तरुण व कार्यकर्त्यांना पक्षामध्ये सामावुन घेतले जाईल असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन देशमुख म्हणाले की, पक्षाची उच्च विचार सरणी मनाला भावली. स्व.इंदिरा गांधी, राजीव गांधी, यांच्या कार्याने प्रभावित झालो होतो. अशा या महान नेत्यांच्या पक्षात मला काम करायला संधी मिळाली. निरपेक्ष, नि:स्वार्थी पणे काम केले. स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारक शिक्षण घेऊन मी साळी ङ्गाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण उपक्रप राबविला. कामाच्या माध्यमातुन युवकांचे संघटन केले. या कार्याची दखल घेऊन पक्षाचे आता नवीन जबाबदारी दिली ती तुमच्या सर्वाच्या सहकार्याने पार पाडील पक्षबांधणीसाठी व युवकांची टिम तयार करण्यासाठी पदाचा उपयोग करीन अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.
या सत्कार सोहळ्यास अजय औसरकर, बापू घोडके, बापु गायकवाड, रुपेश यादव, अमित वारे, स्वामी म्हस्के, सचिन गाडे, रोहन ङ्गरतारे, ऋषिकेश गोपाळ घरे, सागर ढगे, प्रदिप बारबडे, बापुसाहेब तिळकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*