सुकाणू समितीने पोलिसांना बैठकीतून हुसकावून लावले

0

पालकमंत्र्यांना ध्वजा वंदन करुन देणार नाही

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात गठित करण्यात आलेल्या सुकाणू समितीचे रिपोर्टिंग करण्यासाठी आलेल्या पोलिसांना शेतकर्‍यांनी हुसकावून लावले.
14 रोजी रोजी चक्काजाम व 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करून न देण्याचा निर्णय घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कोणता निर्णय होतो याची माहिती काढण्यासाठी गुप्त वार्ता विभागाचे पोलीस साध्या गणवेशात बैठकीला आले होते. हे सुकाणू समिती सदस्यांच्या लक्षात आले.त्यांनी या पोलिसांना बाहेर जाण्याची विनंती केली. आम्हीही शेतकरीच आहोत. असे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र, सुकाणू समितीने त्यांना बाहेर घालवून दिले. नाईलाज झाल्याने पोलीस बाहेर गेले, असे शेतकरी कार्यकर्त्यांनी माध्यमांना सांगितले.
सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान कार्यालयात बैठक सुरू होती. तालुकानिहाय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य मिती निमंत्रक अजित नवले, बाळासाहेब पटारे, सुभाष् लांडे, राजु आघाव, बाबा आरगडे, संतोष वाडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*