सीबीएस बाहेरील विक्रेत्यांवर मनपाची कारवाई

0

नाशिक : नियमित वर्दळीचा परिसर असणारा सीबीएस परिसरात अनेक फळविक्रेते दुकाने थाटून बसतात. यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत असे अखेर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण काढण्यात आले.

अतिक्रमण काढतांना तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणादेखील येठिकाणी दाखल झाली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यात जुने सीबीएस, मेळा बस स्थानक आणि नवीन बसस्थानक येथून बस सोडल्या जातात. तसेच शहरांतर्गत बससेवा याठिकाणी थांबतात. त्यामुळे याठिकाणी प्रवाश्यांची नियमित वर्दळ असते.

काही फळ विक्रेत्यांनी याठिकाणी अनेक दुकाने थाटली होती. त्यामुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण व्हायचा परिणामी पोलीस कर्मचारी आल्याशिवाय येथील वाहतूक सुरळीत होत नव्हती. अनेकदा वादाला सामोरे जावे लागत होते.

दरम्यान, मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत आज येथील सर्व अतिक्रमित दुकाने दूर करून रस्ता मोकळा केला.

LEAVE A REPLY

*