सीटी बस अभिकर्ता संस्थेची खरडपट्टी

0

दुरूस्तीबाबत महापौरांनी दिला आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिकेकडून शहर बस सेवेबाबत पदाधिकारी व अधिकारी तसेच अभिकर्ता संस्थेचे मालक यांची संयुक्त बैठक महापौर सुरेखाताई कदम यांंनी घेतली यावेळी सभागृह नेते अनिल शिंदे, उपायुक्त भालचंद्र बेहेर, यंत्र अभियंता परिमल निकम, अभिकर्ता संस्थेचे धनंजय गाडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, शहर बस सुरु होऊन अडीच वर्षे पूर्ण झालेली आहेत. करारनाम्यानुसार 30 बसची आवश्यकता असताना तेव्हढ्या बसेस त्यांना दिलेल्या 16 मार्गावर चालत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेकडून वारंवार पत्रव्यवहार करून बस चालू करण्याबाबतची मागणी केलेली आहे. बसेसची झालेली अत्यंत दुरावस्था तसेच बसची स्वच्छता वेळेवर करीत नाहीत. खिडक्यांच्या काचा नवीन टाकणे, बाहेर असलेले पत्रे दुरुस्त करणे. रंगरंगोटी करणे तसेच नवीन बस खरेदी करण्याबाबत त्यांना मुदत दिलेली आहे. मनपाची नाहक बदनामी जनतेमध्ये होत असते. त्यासाठी आज तातडीने बैठक घेऊन सदर अभिकर्ता संस्थेला 1 महिन्याची मुदत बसेस दुरुस्त करण्यासाठी दिलेली आहे. बस स्टॅण्ड ते नवीन कोर्टपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी बस लवकरच चालू करणार आहेत. जून महिन्यापासून शाळा, कॉलेज, सुरु होणार आहे. नागरिक, महिला वर्ग शाळेतील मुले यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बसेसची संख्या वाढवून सेवा चांगल्या प्रकारे देण्यासाठी सदरच्या अभिकर्ता संस्थेला महापौर सुरेखा कदम यांनी आदेश दिली.
यावेळी सभागृह नेते अनिल शिंदे म्हणाले, फक्त 10 बसेस फायद्याच्या मार्गावर सदरच्या अभिकर्ता संस्था चालविते. संबंधीत संस्थेला नोटीस देऊन कारवाई करण्यात यावी. तसेच 1 महिन्यापर्यंत नवीन बसेस मागविण्यात याव्यात. खारे कर्जुने, नेप्ती आदी भागातील नागरिक बसची मागणी करतात. कल्याण रोडवर मनपाच्या ओपन स्पेसमध्ये सदरच्या अभिकर्ता संस्थेला बसेस ठेवण्यासाठी जागेची मागणी करून ओपन स्पेस देण्याबाबत लवकरच कार्यवाही करणार आहे. तसेच सदरच्या संस्थेचे कामकाजामध्ये सुधारणा न केल्यास सदरचा ठेका रद्द करण्याबाबत प्रशासनाने अहवाल सादर करावा, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*