सीईटीवर आता कॅमेर्‍याचा वॉच

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यासह राज्यात 11 मे रोजी होणार्‍या इंजिनीअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेवर आता सीसीटीव्हीचे लक्ष राहणार आहे.  उद्या शहरातील 68 केंद्रावर जिल्ह्यातील 22 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.
कोणत्याही केंद्रावर परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जोरदार कंबर कसली आहे.  त्या केंद्राना प्रामुख्याने प्राधान्या दिले आहे.  निवडलेल्या 68 केंद्रपैकी 60 पेक्षा जास्त केंद्रावर  कॅमेरे असणार आहे.  त्यामुळे यंदा या परीक्षेवर संपूर्णपणे कॅमेर्‍याचा वॉच राहणार असून परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मदत होणार आहे.

2 हजार 61 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्त
68 केंद्र प्रमुख 68 सहाय्यक
14 समन्वय अधिकारी 42 सहाय्यक कर्मचारी 224 पर्यवेक्षक
140 सहाय्यक पर्यवेक्षक 917 समवेक्षक
68 लिपीक 103 वाहनचालक
68 शिपाई 224 पाणी वाटप कर्मचारी
123 राखीव कर्मचारी 

  कायदा सुव्यवस्था लक्षात घेता प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एसटीडी बुथ, झेरॉक्स, फॅक्स, दुकान, बंद ठेवले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*