सावित्रीवरील नवा पूलाचे मुख्यमंत्री फडणवीस, गीतेंच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

0

महाडजवळील पनवेल- पणजी या राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक ६६) १९२८मध्ये बांधलेला ब्रिटिशकालीन पूल १ ऑगस्टच्या काळरात्री वाहून गेला होता.

राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी  ६ ऑगस्टला दुर्घटनास्थळी भेट दिली होती यावेळी त्यांनी सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्याची घोषणा केली.

१८० दिवसांचे उद्दिष्ट असताना १६५ दिवसांमध्ये पूर्ण करण्याची कामगिरी मंत्रालय व राज्याच्या बांधकाम खात्याने केली.

सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेला बरोबर दहा महिने होत असतानाच निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्याचा आपला शब्द नितीन गडकरी यांनी पाळला.

३५ कोटी ७७ लाख रुपये खर्चून बांधलेल्या या नव्या पुलाचे गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. ५ जून रोजी उद्घाटनही होत आहे.

LEAVE A REPLY

*