सावत्र पित्याने बालकास विहिरीत टाकून मारले

0

राहाता (वार्ताहर)- बायकोला पहिल्या नवर्‍या पासुन असलेल्या मुलास सांभाळण्यास नकार देत सावत्र बापाने पाच वर्षाच्या मुलास विहीरीत टाकुन खुन केल्याची घटना पुणतांबा येथे घडली. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मुलाची आई निर्मला वंसत पवार (25 बहीरोबा मठ पुणतांबा ) हिने राहाता पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, सुनिल श्रीपात गांगुर्डे याच्याशी माझे पहीले लग्न झाले होते. लग्ना नंतर मी त्याच्याची सात वर्ष संसार केला. या दरम्यान मला वैष्णवी व आदित्य ही दोन मुले झाली. मात्र या नंतर नवरा सुनिल गांगुर्डे मला सोडून निघुन गेला.

त्यानंतर मी माहेरी आई वडीलाकडे आली. आईवडीलांनी माझे वसंत रोडोबा पवार (52) याच्याशी सात महिण्या पुर्वी दुसरे लग्न लावुन दिले. माझी मुलगी वैष्णवी माहेरी आई बापाकडेच होती व माझा मुलगा अदित्य माझ्या सोबत होता. दरम्यान च्या काळात नवरा वसंत पवार याने मुलाला तुझ्या आई बापाकडे नेऊन घाल असे सागंत वाद घातला.

एक मे रोजीच्या रात्री मुलगा अदित्य (वय पाच) हा घराबाहेर झोपला असता नवरा वसंत पवार याने त्याला घरापासून काही अंतरावर असलेल्या विहीत नेऊन टाकुन जिवे मारले. निर्मला वंसत पवार यांच्या फिर्यादी वरुन राहाता पोलिसानी आरोपी वसंत रोडोबा पवार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप दहीफळे करीत आहे .

LEAVE A REPLY

*