साखळीचोरच निघाला लाखलगाव पेट्रोलपंप दरोड्यातील संशयित

0

नाशिक, ता. ४ : लाखलगाव येथील गौरव पेट्रोलपंपावर अलिकडेच पडलेल्या दरोड्याचा गुन्हा उलगडण्यात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

या संदर्भात तपास सुरू असता, गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी नितीन पारधी (२२) याच्याकडे साखळी चोरी सोबतच लाखलगाव दरोड्याबद्दल विचारपूस करण्यात आली.

त्यावर त्याने आपण साथीदारांसह संबंधित पंपावर दरोडा टाकून रोख रक्कम व पल्सर मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले.

त्यानंतर आडगाव पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने अधिक तपास करून  सोमनाथ बर्वे (२६, रा. मातोरी गाव), नितीन पारधी (२३, मखमलाबाद शिवार), अनिल भाऊराव पवार ( २३, सैयद पिंपरी), नितीन विलास पिंगळे (१९, मातोरी गाव), शुभम गायकवाड ( १९, कोळीवाडा, मखमलाबाद), संभाजी कवळे (२२, रा. लिंकरोड, त्र्यंबक सातपूर रोड), देवीदास मोतीराम पवार उर्फ गटल्या, (२६ रा. नवनाथनगर, पेठरोड यांना ताब्यात घेण्यात आले. तर त्यांचे इतर साथीदार फरार आहेत.

संशयितांकडून वाहनचोरी, मोबाईल चोरीसह इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*