सांघिक भावना आणि समन्वयाने नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य

0
शहादा । दि.12 । ता.प्र.-नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले.
जून महिन्यात सुरू होणार्‍या मान्सूनपुर्व तयारीसाठी तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नरेश कोचरा, पोलिस निरिक्षक शिवाजी बुधंवत, कृषी अधिकारी एस.बी.बागुल, तालुका आरोग्य अधिकारी मोहन पटेल, कनिष्ठ अभियंता पाटबंधारे जी.बी. पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार मनोज खैरनार यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी संबंधीत विभागाचा सन 2017 चा आपत्ती व्यवस्थापन आराखडा,एसओपी व महत्वाच्या दुरध्वनी क्रमांकाच्या अद्यावत याद्या तयार करुन तालुका प्रशासनास सादर करणे, 24 बाय 7 विभाग निहाय नियंत्रण कक्ष स्थापन करणे, विभागनिहाय मदत व बचाव पथकांची स्थापना व नोडल ऑफीसर यांची नियुक्ती करणे, शहरातील सर्व लहान मोठ्या गटारी, नाले तसेच शहरातील सार्वजानिक विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना गती देणे, शहरातील अतिक्रमीत भागातील अतिक्रमणे त्वरीत दूर करणे.

अग्निशमन दल सुसज्ज व अद्यावत ठेवणे तसेच अग्निशमन कार्यासाठी आवश्यक वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे, वीज वितरण कंपनीने विज व अटकाव यंत्रणा सज्ज असण्याबाबत आपले स्तरावर खात्री करणे, धरणाच्या विसर्गाची माहिती ज्या-ज्या वेळी धरणातुन विसर्ग केला जाईल त्या-त्या वेळी या कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात कळविणे व योग्य दखल घेणे.

पुररेषेची आखणी करुन त्या ठिकाणावरील अतिक्रमणे त्वरीत काढणे. मान्सुन कालावधीत साथीचे रोग पसरु नयेत म्हणुन त्या दृष्टीने पुर्व नियोजन करणे.

मान्सुन कालावधीत सर्व नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कामी नियोजन करणे. विभागनिहाय शोध बचाव साधन सामग्रीची देखभाल व दुरुस्ती करणे व ते सुसज्ज ठेवणे, विज वितरण कंपनीने विज वाहक तारांना अटकाव होणार्‍या झाडांच्या फांद्या काढून विज वाहक तारा मोकळ्या करणे.

तसेच आपल्या विभागाशी संबंधीत सर्व यंत्रणा तसेच आराखडे अद्यावत करुन सुसज्ज करणे, अशा सुचना तहसिलदार मनोज खैरनार यांनी आयोजित बैठकीत उपस्थितांना केल्या.

तालुक्यात वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसात अंगावर वीज पडून काही जणांवर मृत्यू ओढवला. अशावेळी त्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून देण्यात येणारी शासकीय मदतीसाठी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे तहसिलदार यांनी कौतूक केले.

करत तालुक्यातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बाधितांना तात्काळ मदत पुरविण्यासाठी तत्पर राहून कामकाज केल्यास नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला सहजपणे करता येईल असा विश्वासही तहसिलदार श्री.खैरनार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*