सलमान खान ‘बिग बॉस’ आणि ‘दस का दम’ दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणार

0

सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती.

या कार्यक्रमाचे काही सिझन झाल्यानंतर या कार्यक्रमाला सलमानने रामराम ठोकला. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात व्यग्र झाला. बिग बॉस हा कार्यक्रम गेल्या अनेक सिझनमध्ये टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे.

दस का दम हा कार्यक्रम परत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. पण दस का दम सुरू झाल्यास सलमान बिग बॉस करणार नाही असेदेखील म्हटले जात आहे. सलमान गेल्या अनेक सिझनपासून बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय या कार्यक्रमाचा प्रेक्षक विचार देखील करू शकत नाही. बिग बॉस सलमान करणार नाही हे कळल्यापासून सलमानचे फॅन्स उदास झाले होते. पण त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

सलमान बिग बॉस आणि दम का दम या दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याचे म्हटले जात आहे. दस का दम हा कार्यक्रम जानेवारी 2018 ला सुरू होणार असल्याचे कळतेय आणि बिग बॉस या कार्यक्रमाचे तो या वर्षाच्या अखेरीस चित्रीकरण करणार आहे. दोन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या कालावधीत सुरू होत असल्याने सलमान दोन्ही कार्यक्रमाचा भाग असू शकेल असे म्हटले जात आहे.

इंडियाज गॉट टायलेंट आणि झलक दिखला जा या दोन्ही कार्यक्रमाचे सिझन या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार नसल्याने बिग बॉस नेहमीपेक्षा यावर्षी लवकर सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*