सलमान खान करणार ‘नागीन’ मौनी रायला लॉन्च!!

0

मौनीला आपल्या होम प्रॉडक्शनअंतर्गत बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचे सलमानने मनावर घेतले आहे. सलमानच्या मते, मौनीचा देसी लूक अतिशय सुंदर आहे.

ती साडीसह सगळ्याच पारंपरिक व वेस्टर्न कपड्यांमध्ये सुंदर दिसते. त्याचमुळे मौनीला बॉलिवूडमध्ये आणण्याचे त्याने ठरवले आहे.
तसे तुम्हाला ठाऊक असेलच की, सलमान मौनीचा खूप मोठा फॅन आहे. ‘बिग बॉस’मध्ये जेव्हा केव्हा टीआरपीचा विषय निघाला, प्रत्येकवेळी सलमानने ‘नागीन’ मौनी रायची आठवण केली. ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढावा म्हणून या शोच्या मंचावर मौनी स्पेशल डान्स परफॉर्मन्स करताना दिसली होती.

मौनीबद्दल सलमानचे प्रेम इथेच संपत नाही. अलीकडे सलमानने आपल्या बर्थ डे पार्टीला मौनीला खास निमंत्रित केले होते. खास इनिविटेशन देऊन त्याने मौनीला पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर पार्टीसाठी बोलवले होते.
मौनी रायने ‘नागीन’ या मालिकेद्वारे प्रचंड लोकप्रीयता मिळवली. त्याआधीही ‘बुध राजाओं का राजा’, २०१३ मध्ये आलेले ‘महाभारत’, ‘देवो का देव महादेव’ आदी मालिकांमध्ये मौनी दिसली होती.

 

LEAVE A REPLY

*