सर्व खेळांना सवलतीचे गुण मिळावे

0

नंदुरबार /शासन निर्णयानुसार 42 खेळाव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडीया यांच्यावतीने सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात शासनाच्यावतीने झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन झाले होते.

यात नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनीही सहभाग नोंदविला आहे. परंतू शासन निर्णयानुसार 42 खेळाव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

या संदर्भात नंदुरबार अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील व क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांना जिल्ह्यातील खेळाडूंनी निवेदन दिले.

 

LEAVE A REPLY

*