सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर न्यायमूर्ती कर्णन गायब? पश्चिम बंगाल पोलिसांचा शोध सरूच!

0

सर्वोच्च न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी कर्णन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर न्यायमूर्ती सी. एस. कर्णन हे ‘बेपत्ता’ झाले आहेत. त्यांना अटक करण्यात येणार होती.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूचे पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहेत.

बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास चेन्नईकडे रवाना झालेल्या कर्णन यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

प्रसारमाध्यमे आणि चेन्नई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळीच कर्णन यांनी सरकारी अतिथीगृह सोडले आहे.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील कलाहस्तीच्या दिशेने ते रवाना झाले आहेत, असे त्यांच्या मोबाईल फोन लोकेशनवरून दिसते.

दरम्यान, न्यायमूर्ती कर्णन अटक टाळण्यासाठी देश सोडून गेले असावेत. ते नेपाळ किंवा बांगलादेशात जातील, अशी शक्यता त्यांचे निकटवर्तीय डब्ल्यू पीटर रमेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. मात्र, मार्ग आणि इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*